चिखलीत काँग्रेसचा माणूस फोडला! रफिक शेठच्या गळ्यात भाजपचा रुमाल..

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद आले, त्यावेळी जिल्ह्यात काँग्रेसला चांगले दिवस येतील असे वाटत होते. मात्र झाले उलटेच.. हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेत्यांना काही रुचलेले दिसत नाही..एकापाठोपाठ एक काँग्रेसचे शिलेदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत.. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे चिखली नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष हाजी रफीक शेठ यांचा याचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही..त्यांनी राहुल बोंद्रे यांची साथ सोडली आहे. आज ७ मे रोजी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप प्रवेश केला आहे.. चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यावेळी उपस्थित होत्या.
रफिक शेठ यांनी चिखली नगरपालिकेत उपाध्यक्ष पदाचा अनुभव आहे. विशेषत: मुस्लिम समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. चिखली नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने रफिक शेठ यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे..भाजपने राहुल भाऊंचा माणूस फोडला अशा प्रतिक्रिया चिखलीत उमटत आहेत...