गोपीनाथ गडावर श्रद्धा असलेला समाज हा महायुतीची महाशक्ती! भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांचे प्रतिपादन! खा.प्रतापराव जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन

 
देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  गोपीनाथ मुंडे यांनी सर्वप्रथम भाजप शिवसेना युतीसाठी आग्रह धरला, सर्व हिंदुत्ववादी विचारसरणी एका छताखाली असावी अशा महान विचाराने या माणसाने केलेला हा प्रयोग इतिहास घडवून गेला. आजही महायुती गोपीनाथजी मुंडे, प्रमोद जी महाजन यांच्या विचारसरणीवर सुरू आहे . 

तळागाळातून आलेल्या गोपीनाथजी मुंडे यांनी "माधव" समाजासाठी केलेली हक्कांची मागणी असो , की तळागाळातील ऊसतोड कामगारांसाठी केलेले महामंडळाची स्थापना असो, समाजासाठी सर्वस्व अर्पण करण्याची गोपीनाथराव मुंडे यांची तयारी होती. आदरणीय गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून मिळालेले हेच बाळकडू पंकजाताई ,पूनम ताई व धनंजयजी मुंडे यांनीही सुरू ठेवले आहे. त्यांनी तळागाळातील सुविधा नसलेल्या लोकांसाठी केलेल्या कामामुळेच महायुतीचा घटक असलेल्या या नेत्यांच्या जवळ सर्व स्तरातील गरीब आपल्या व्यथा घेऊन येत असतात.त्यामुळे विकासाच्या प्रवाहात येऊ पाहणाऱ्या सर्व गरिबांचा, तळागळातील सर्व लोकांचा आशीर्वाद हा महायुतीच्या सर्व नेत्यांसोबत नेहमीप्रमाणेच राहील ,असा आशावाद ,महाराष्ट्र प्रदेश भाजपा प्रवक्ते श्री विनोद वाघ यांनी व्यक्त केला. गोपीनाथ गडावर श्रद्धा असलेला हा समाज हीच महायुतीची महाशक्ती आहे असेही ते यावेळी म्हणाले. खा.प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार. प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सिंदखेडराजा येथे बोलताना श्री विनोद वाघ यांनी हे वक्तव्य केले.