कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे .... झालीच पाहिजे ...!उबाठा शिवसेनेचा बुलढाण्यात ‘जनआक्रोशाचा’ वार ! रमी खेळणारा मंत्री, अघोरी पूजा करणारा मंत्री देखाव्यातून दिसले....
Aug 11, 2025, 18:30 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील महायुतीच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या आणि भ्रष्टाचारी कलंकित मंत्र्यांचा राजीनामाच्या मागणीसाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज "जनआक्रोश आंदोलनाचा वार" बुलढाण्यात करण्यात आला. जिजामाता प्रेक्षगार मैदानाच्या परिसरात धरणे आंदोलनातून, निदर्शनातून भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे ...झालीच पाहिजे.. ही मागणी रेटून धरण्यात आली.
रमी खेळणारा कृषी मंत्री , गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा डान्सबार , पैशाचा बॅगा शेजारी ठेऊन बसलेला मंत्री, अघोरी पूजा करणारा मंत्री , सामान्यांना ठोसा मारणारा लोकप्रतिनिधी अशा एकाहून एक प्रतिकात्मक जिवंत देखावे या आंदोलनात सादर करण्यात आले. हे देखावे लक्षवेधक ठरले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी महायुती सरकारच्या विरोधात आपल्या भाषणातून आक्रमक हल्ला चढवला. या आंदोलनाची सुरुवात
"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" या महाराष्ट्र गीताने झाली. कलापथकांनी सादर केलेल्या "दोन दिवसाची दुनिया पाहू द्या... आमच्या कष्टाचा आम्हाला खाऊ द्या" अशा प्रकारच्या गीतांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. जिल्हाभरातून आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.
सरकारविरुद्धचा लढा सुरूच राहील : आ. सिद्धार्थ खरात....
हे शासन फसवेगिरी करून सत्तेवर आलेले आहे. खोटे आमिष देऊन आलेले आहे. महाराष्ट्रातील मंत्री, आमदार यांनी प्रगती, विकास यावर काम करायच सोडून मंत्री काय करतात हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. कृषी मंत्री कोकाटे रमी खेळतो, मग म्हणतो शासन भिकारी आहे.
सुसंस्कृत महाराष्ट्राला थोर परंपरा लाभलेली आहे.
अशा असताना या महाराष्ट्रातील मंत्री कलंक लावण्याचे काम करत आहेत.
भ्रष्टाचार करायचा आणि पैसे कमवायचे हाच उद्योग सुरू आहे. या आंदोलनात दाखवलेल्या प्रतिकात्मक देखाव्यांनी मंत्री कसे काम करत आहेत हे पुन्हा एकदा जिवंत झालं. आंदोलनाची ही सुरुवात आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काम करून हे शेतकरी विरोधी सरकार खाली खेचण्यासाठी आगामी काळात हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असेही आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले.
राज्याची प्रतिमा खराब करण्याचं काम मंत्र्यांनी केले : जयश्री शेळके
आपले महाराष्ट्र राज्य महान आहे हे आपण देशात अभिमानानाने सांगतो. त्याच आपल्या राज्याचे मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकतात, मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवतात. कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळताना. एक एक कारनामे या सरकारचे बाहेर येत आहेत. एकपेक्षा एक वरचढ असे कारणाने त्यांचे आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार सर्व सामान्य माणसावर "बॉक्सिंग स्कील" दाखवत मारहाण करत, कॅन्टीन केसरी म्हणून मिरवतात. तरी देखील राजीनामे घेतले जात नाहीत. राज्याची प्रतिमा रसळतला नेल्या जात आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. लाडक्या बहिणीच्या निधीला कट लावण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने झोपेच सोंग घेतले असल्याची खरमरीत टीका राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी केली.
सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री हतबल : जालिंदर बुधवत
शेतकऱ्यांना न मागता ही दोन लाख रुपयांची कर्जमाफी देणारे उद्धव साहेब हेच एकमेव शब्द पाळणारे नेते आहेत. शिवसेना ही कायम समाजासोबत राहत आलेली आहे. कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी या आंदोलनाबाबत आदेश दिले आणि आज राज्यभर हा वनवा आंदोलनाच्या रूपातून पेटत आहे.
मायबाप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सामान्यांचे प्रश्न जैसे थे असताना राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्यसहित भ्रष्टाचाराचा कलंक गाठला आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत आहे. पीक कर्जाचे नुसते आश्वासन सरकारने दिले. निवडणूक पूर्वी दिलेल्या आश्वासनाचा सत्तेत येताच महायुती सरकारमधील पक्षांना विसर पडला आहे. पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहे. लाडक्या बहिणाना आता पैसे कमी करून देण्यात येत आहे. लाखो बहिणाना यातून वगळण्यात येत आहे. दुसरीकडे या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बेताल व्यक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ज्यांना विधिमंडळात रमी खेळण्यामुळे आता क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं. खरंतर त्याचा प्रमोशन केलं की काय असं लोकांना वाटत आहे. अघोरी पूजेचे थोतांड मांडणारे मंत्री भारत गोगावले, ज्यांच्या घरातून पैशांच्या बॅगांचे व्हिडिओ व्हायरल झाले ते मंत्री संजय शिरसाट आणि कळस म्हणजे गृहराज्यमंत्री असतानाही ज्यांच्या आईच्या नावाने असलेल्या बारमध्ये पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पितळ उघड पडलेले मंत्री योगेश कदम यांना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. केवळ सत्ता टिकवण्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस हे हदबल झालेली यातून दिसतात अशी जहरी टीका याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत त्यांनी केली.
महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंदाताई बढे म्हणाल्या की, आपल्या राज्यात बार चालवणारे गृह राज्य मंत्री आहेत. त्यामुळे या झोपलेल्या सरकारला आम्ही जागी करत आहोत. या मंत्र्यांना काढून टाकलं पाहिजे. सहसंपर्क प्रमुख वसंतराव भोजने, नंदू कऱ्हाडे यांनी भाषणातून आक्रमक हल्ला चढवला. जिल्हा प्रमुख गजानन वाघ म्हणाले की, या मंत्र्यांचे राजीनामा घेतले नाही तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करू. जिल्हा समन्वयक संदीप शेळके म्हणाले की, केवळ नाटकं करणारं हे राज्य सरकार आहे. विधिमंडळात कृषी मंत्री रमी खेळतो. तरी देखील त्यांना पाठीशी मुख्यमंत्री घालत आहेत. मतांची चोरी सर्वत्र झाली, त्यामुळे यांच्यावर कारवाई करणे मुख्यमंत्र्यांना डोईजड होत असल्याचेही ते म्हणाले.
सुमारे अडीच ते तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी बुलढाणा यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. याबाबत उचित कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने यापुढेही आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी मेहकर विधानसभाचे आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना प्रवक्ता सौ.जयश्रीताई शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ, जिल्हा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, महिला जिल्हाप्रमुख चंदाताई बडे, महिला जिल्हाप्रमुख विजयाताई खडसन, बुलढाणा जिल्हा समन्वयक संदिपदादा शेळके, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, विधानसभा संघटक सुनील घाटे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, उपजिल्हाप्रमुख बद्रि बोडखे, उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर , उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख विजय इतवारे, तालुका प्रमुख विजुभाऊ इंगळे, तालुका प्रमुख किसन धोंडगे, तालुका प्रमुख राजू बुधवत, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, तालुका प्रमुख श्रीराम खेलदार, तालुका प्रमुख दीपक चांभारे, गजानन बिलोकर, प.स.माजी सभापती सुधाकर आघाव, युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश डोंगरे, युवा सेना तालुकाप्रमुख संजय शिंदे,शेख रफिक, अनिकेत गवइ, भीमराव पाटील, शुभम घोंगटे, महिला उपजिल्हाप्रमुख प्रतिक्षा पिंपळे, दिपाली पाटील,व गजानन धांडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.