जिल्ह्याच्या शाश्वत विकासाच्या चळवळीला साथ द्या! मालतीताई शेळके यांचे आवाहन; मोताळा तालुक्यात प्रचार दौरा

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून वन बुलडाणा मिशन ही चळवळ जिल्हा विकासासाठी तयार झालेली चळवळ आहे. बुलढाणा जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसण्यासाठी तसेच विकासाबाबत जिल्हा नंबर एक वर असला पाहिजे या हेतूने वन बुलढाणा मिशन ही राजकीय चळवळ कार्यरत आहे. जिल्ह्याचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठेवून संदीप शेळके लोकसभेची निवडणूक लढत आहेत. जिल्हा वासियांना शाश्वत विकासाची हमी ते देत आहेत. विकसित जिल्ह्याचे चित्र टिपण्यासाठी संदीप शेळके कटीबद्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या शाश्वत विकासाच्या चळवळीला साथ द्या. असे आवाहन राजश्री शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालती शेळके यांनी केले. संदीप शेळके यांच्या प्रचारादरम्यान मोताळा तालुक्यातील विविध गावातील जनतेशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
Advt.👆
अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या प्रचारार्थ राजश्री मल्टीस्टेट च्या अध्यक्षा मालती शेळके ह्या मोताळा तालुक्यात प्रचार दौऱ्यावर होत्या. यावेळी पिंपळगाव देवी, महाळुंगी, लिहा, 
उऱ्हा, आव्हा, कोल्ही गोलर, निपाणा, शेलगाव बाजार, सारगाव, जहागीरपुर, माकोडी, पिंपरी गवळी, वडगाव, पुनई, सारोळा पिर या गावांमध्ये भेटी देवून संदीप शेळके यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे व जिल्ह्याच्या शाश्वत विकासाच्या चळवळीला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, संदीप शेळके यांनी जिल्हा विकासासाठी व्रत स्वीकारलं आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. याच हेतूने संदीप शेळके ही लोकसभा निवडणूक लढवत आहेत. सुरुवातीपासून विकासाचे व्हिजन मांडल्याने जनतेने परिवर्तनाचा निर्धार केलेला आहे. जनतेला विकास पाहिजे, संदीप शेळके हे विकासासाठी कटिबद्ध असल्याने जनतेचे प्रेम त्यांना मिळत आहे. यावर्षीच्या निवडणुकीत परिवर्तन घडणार हे निश्चित आहे. असेही मालतीताई शेळके म्हणाल्या.