सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी सत्ताधाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही रविकांत तुपकरांची संतप्त प्रतिक्रिया! म्हणाले सरकारला सोयाबीन कापूस उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार..!
पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे. तर कापसाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तुपकर म्हणाले कि, येत्या काळात राज्यकर्त्यांना शेतमालाच्या घसलेल्या भावांमुळं रोषाला सामोरं जावं लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा, टोमॅटो उत्पादकांनी अजित पवारांचीच वाट अडवली. येत्या काळात सोयाबीन उत्पादक पट्ट्यात अर्थात विदर्भात बाजारभाव कमी असल्यानं शेतकरी आक्रमक होऊ शकतात.
भाजपचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेल्या विदर्भात भाजप नेत्यांना याचा फटका बसू शकतो. याचा प्रत्यय काल नाशिक जिल्ह्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कांदा, टोमॅटो भाजीपाल्याच्या पिकांचे शेतकरी सतत संकटात आहेत. तर गेल्या २ वर्षांपासून कापूस आणि सोयाबीनला भाव नसल्यानं यंदाही तीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे तुपकर म्हणाले.