तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिन मधून धूर काढू! हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांची प्रतिक्रिया; जिल्हा परिषदेच्या समोर केली शासन निर्णयाची होळी....
बुलढाण्यात मनसेकडून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आज बुलढाणा जिल्हा परिषदे समोर जोरदार आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली. दरम्यान हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची प्रत फाडत मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली केली. राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने पहिल्या वर्गापासून हिंदी भाषेची सक्ती केलेली आहे. आणि ही सक्ती कदापि महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती योग्य नाही. खपवून घेतल्या जाणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला प्रचंड प्रमाणात विरोध करणार आहे. यापुढे जर हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्र शासनाने केली आणि तो निर्णय मागे घेतला नाही तर यापुढेचा जो धूर आहे तो शिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिन मधून निघेल याची गंभीर दखल शासनाने घेतली पाहिजे. निर्णय ताबडतोब घेतला पाहिजे. अशी प्रतिक्रिया मनसे चे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी दिली आहे.