राजपूत समाजाच्या आर्थिक विकास महामंडळासाठी श्वेताताईंचा यशस्वी पाठपुरावा! डॉ. प्रतापसिंह राजपूत यांचे प्रतिपादन! म्हणाले, विजय श्वेताताईंचाच होणार;ताईंनी तळागाळात विकास पोहोचवला म्हणाले....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले खऱ्या अर्थाने "विकासकन्या" आहेत. केवळ अडीच वर्षांत एवढी विकास कामे करणे हे काही साधे सोपे काम नाही. १० वर्षांत मागे पडलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघाला विकास पथावर आणणे हे एक शिवधनुष्य उचलण्यासारखेच होते. मात्र श्वेताताईंनी आपल्या कार्यकर्तुत्वातून अनेक आव्हानांचा यशस्वी सामना करीत मतदारसंघात विकास गंगा आणली. ताईंनी सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना सोबत घेऊन विकासकामे केली. राजपूत समाज बांधवांसाठी हिंदूसूर्य महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ व्हावे अशी मागणी कित्येक दिवसांपासून होती. श्वेताताईंनी याचा यशस्वी पाठपुरावा करून ही मागणी मान्य करून घेतली. विकासकामांच्या भरवशावर श्वेताताई महाले पाटील या विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास जेष्ठ भाजप नेते डॉ. प्रतापसिंह राजपूत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. 
 एक महिला लोकप्रतिनिधी कसा असावा याचे आदर्श उदाहरण श्वेताताईंनी संपूर्ण राज्याला दाखवून दिले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील गावागावात श्वेता ताईंनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली. हे करतांना त्यांनी सर्व समाजाला सोबत घेतले. राजपूत समाज बांधवांसाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी कित्येक वर्षांपासून होती, या मागणीचा यशस्वी पाठपुरावा श्वेताताईंनी केला डॉ.प्रतापसिंह राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ५ वर्षांत श्वेताताईंनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, त्यामुळे या कर्तुत्ववान लेकीला मायबाप जनतेने पुन्हा एकदा विधानसभेच्या सभागृहात पाठवावे असे आवाहनही डॉ. राजपूत यांनी केले...