बुलढाण्यात वंचितची धक्कादायक एक्झीट; चार सदस्यपदाच्या उमेदवारांनीही घेतली माघार; नगर पालिका अध्यक्षपदाची निवडणूक आता तिरंगी होणार; काँग्रेसला मिळाला दिलासा...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीतून वंचितची 20 नोव्हेंबर रोजी धक्कादायक एक्झीट झाली. नगराध्यक्षपदाच्या वंचितच्या उमेदवार संगिता अर्चित हिरोळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.जिल्ह्रयात काँग्रेस आणि वंचितची युती आहे. या माघारीमुळे आता काँग्रेसच्या उमेदवाराला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.20 नोव्हेंबर रोजी सदस्यपदाच्या चार उमेदवारांनीही माघार घेतली आहे.
बुलढाणा नगर पालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसत होती. नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिंदे सेनेत लढत होणार आहे.तसेच कॉग्रेसच्या उमेदवारांमुळे ही लढत आता तिरंगी होणार आहे.वंचितने संगिता हिरोळे यांच्या रुपाने दमदार उमेदवार दिल्याने अध्यक्षपदाची निवडणुक रंगतदार झाली होती. काँग्रेस आणि वंचितने युती केली असली तरी बुलढाण्यात दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले होते. त्यामुळे, वंचितने काँग्रेसचा पाठींबा मागितला असता त्यांनी नकार दिला. त्यामुळे मतविभाजन होवून पराभव स्विकारल्यापेक्षा सन्मानाने माघार घेण्याचा निर्णय वंचितने घेतला आहे. दरम्यान, गुरूवारी प्रभाग क्रमांक 10 ब चे उमेदवार निषाद विलास यरमुले, प्रभाग क्रमांक 1 अ मधून करण अर्जून बेंडवाल, 10 ब मधून सागर शामराव घट्टे तर 8 अ मधून जयश्री विशाल येवले यांनी माघार घेतली आहे.

 बुलढाणा पालिकेत आता अध्यक्षपदासाठी 11 तर सदस्यपदासाठी 178 उमेदवार अजुनही रिंगणात आहेत.त्यामुळे बंडखोरांबरोबरच इतर अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी राजकीय पक्षांचे उमेदवार प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे, येत्या काही दिवसात आणखी काही उमेदवार माघार घेणार आहेत. माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर लढती निश्चित होणार आहेत.