धक्कादायक ! ग्रामपंचायत महिला अधिकाऱ्याने लाटला ‘लाडकी बहीण’चा लाभ; गलेलठ्ठ पगार असूनही सरकारच्या योजनेंतर्गत दीड हजारांची हाव!

 
ग्रामपंचायत अधिकारी मंदाकिनी वाघ यांच्या नावावरून १२ हप्त्यांचे पैसे थेट बँक खात्यात जमा झाले, अशी माहिती पडताळणीत समोर आली.

 दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी “मी अर्ज केलेला नाही, नातेवाइकांनी माझ्या नावाने अर्ज दाखल केला” अशी सफाई दिली. 

या संदर्भात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तारामती मुंडे यांनी सांगितले की, “ग्रामपंचायत अधिकारी यांनीच अर्ज दाखल केल्याचे त्यांनी मला सांगितले होते. त्यांना लेखी स्वरूपात लाभ न घेण्याच्या सूचना दिल्या असून, घेतलेली रक्कम शासनाकडे परत करण्याचे सांगितले आहे.”