शिवसेना तालुकाप्रमुख सुरेशत्यात्या वाळुकर म्हणाले,
बाहेरचे पार्सल बाहेरच पाठवणार! मेहकरात आ. रायमुलकरांचाच गुलाल उधळणार....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी विकासाची गंगा आणली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आ. डॉ. रायमुलकर अलीकडच्या अडीच वर्षांत ४ हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघात आणला.त्यामुळे ते विजयाचा चौकार मारणार ही काळ्या दगडावरची रेष असून इथली जनता बाहेरचा पार्सल उमेदवार बाहेरच पाठवणार असा हल्लाबोल शिवसेना तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर यांनी केला.काल, विराट जनसमुदायाच्या उपस्थितीत मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यांनी अर्ज भरला. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी वाळूकार बोलत होते...
  उबाठा वाल्यांना मेहकर - लोणार मध्ये उमेदवार देखील मिळत नाही एवढी वाईट अवस्था त्यांची आहे. जो उमेदवार महाविकास आघाडीने दिला आहे त्या उमेदवाराला मतदार संघाचा नकाशा देखील माहिती नाही.शहरातील रस्ते माहीत नाहीत. केवळ निवडणुकीच्या तोंडावर शहरात येऊन राहणाऱ्याला जनता स्वीकारणार नाही. इथली जनता बाहेरचे पार्सल बाहेर पाठवेल आणि यावेळी आमदार संजय रायमुलकर रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील आणि आ. रायमुलकर यांचाच गुलाल उधळला जाणार असेही सुरेशतात्या वाळुकर यावेळी म्हणाले..