“महायुती टिकवा, कार्यकर्ता वाचवा!” शिंदे सेनेचे भाजपला आवाहन, थेट पत्र देऊन केली विनंती...
पुढे म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकांमध्येही ही युती प्रामाणिकपणे कायम ठेवावी, अशी आमची नम्र विनंती आहे. शिवसेनेचा आणि भाजपचा मतदार हा समान हिंदुत्ववादी विचारांचा आहे; त्यामुळे जर मतांमध्ये फूट पडली तर त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होईल आणि महायुतीचे नुकसान होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
शिवसेनेने पुढे नमूद केले आहे की, “महायुतीतील कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. मतभेदांमुळे तो पडला तर त्याला उभं राहण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. त्याचे ‘एकदा तरी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य व्हावे’ हे स्वप्न चुरगळले जाईल. त्यामुळे कार्यकर्ता वाचवण्यासाठी आणि महाविकास आघाडीला सडेतोड उत्तर देण्यासाठी महायुती भक्कम करणे आवश्यक आहे.”
शेवटी शिवसेनेने भाजपला चर्चेचे आमंत्रण देत, युतीसाठी संवादाचे दरवाजे खुले ठेवले असल्याचेही स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या आवाहनानंतर आता भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात गत काही दिवसापासून युतीविषयी वक्तव्य येत होते.त्यात शिंदे सेनेने चिखलीचे नगराध्यक्ष पद मागितले होते तर भाजपने ती मागणी नाकारली होती.त्यामुळे जिल्ह्यात महायुतीची शक्यता संपुष्टात आली होती.आता शिंदे सेनेच्या या भूमिकेवर भाजप काय प्रतिक्रिया देते यावर लक्ष लागले आहे.