भाजपच्या युवा माेर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी संताेष काळे; भाजपची ‘जंबो’ जिल्हा कार्यकारिणी जाहीर! नऊ उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, नऊ सचिव, पाच मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांचा समावेश..!
Jul 25, 2025, 20:51 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने जंबाे जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे. भाजप युवा माेर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी चिखली तालुक्यातील येवता गावचे सुपुत्र संतोष काळे यांची नियुक्ती केली आहे. चिखली मतदार संघाच्या आमदार श्वेताताई महाले यांचे खंदे समर्थक म्हणून काळे ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी विविध पातळ्यांवर पक्षासाठी काम करताना युवा कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणादायी नेतृत्व म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या ठाम भूमिका, संयमी नेतृत्वशैली आणि प्रभावी वक्तृत्वामुळे त्यांना हे महत्त्वाचे पद मिळाले आहे. यापूर्वी त्यांच्याकडे युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी होती, ती जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळलेली आहे.पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीकृष्ण सपकाळ यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी ही कार्यकारणी जाहीर केली आहे. या नियुक्त्यामधून जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक समतोल साधत संघटनात्मक बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याअंतर्गत नऊ जिल्हा उपाध्यक्ष, चार जिल्हा सरचिटणीस, नऊ जिल्हा सचिव, एक कोषाध्यक्ष, एक प्रसिद्धी प्रमुख आणि पाच मोर्चा जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ९ जणांची जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी गजानन कडूबा घुले, उदय भास्करराव देशपांडे, विजयाताई राठी, गजानन सुखदेव घोंगडे, देविदास तुकाराम जाधव, चंद्रकांत बर्दे, सुभाषराव घिके, संजय माणिकराव गाडेकर, एकनाथ सीताराम जाधव यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीसपदी चार जणांची निवड दत्ता गवळी पाटील, श्रीराम मुंढे, पंजाबराव धनवे, प्रकाश गवई यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा सचिव (चिटणीस) पदी डॉ. मधुसूदन सावळे, अशोक किंहोळकर, विजय पवार, श्रीकृष्ण सपकाळ, डॉ. शंकर तळबे, अनंता शिंदे, सिद्धार्थ शर्मा, राजेश भुतडा, भगवान बेंडवाल आणि जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून चिखलीचे माजी नगराध्यक्ष सुहास शेटे यांची, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून पत्रकार नितीन शिरसाठ यांची नियुक्ती केली. किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी चक्रधर लांडे यांची तर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सविता संजय पाटील, अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन सोळंके,शिक्षक आघाडी संयोजकपदी संदीप नरोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.