संदीप शेळकेंचा मेहकर, डोणगाव येथील रोडशो ठरला सुपरहिट! प्रचारही जोमात; म्हणाले, सामान्यांचा आवाज दिल्लीच्या तख्तावर बुलंद करायचाय; प्रस्थापित नेते स्वतःला राजे समजत असल्याचा आरोप...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) तुम्ही इतकी वर्ष झाली प्रस्थापित नेत्यांना मते दिले. परंतु ते स्वतःला राजे समजायला लागले आहेत. सामान्य जनतेकडे पाहायला त्यांना वेळ मिळत नाही. फक्त निवडणूक आली की जनतेजवळ यायचं आणि मतं मागायची. त्यांनी कधी विकासाची भाषा केली नाही, स्वतःच्या हितासाठी ते निवडणूक लढवत आले आहेत. अशा शब्दात अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. आणि वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून सामान्यांचा आवाज दिल्लीच्या तख्तावर बुलंद करायचा आहे असे प्रतिपादन केले. काल शुक्रवार, १९ एप्रिलला संदीप शेळके यांच्या प्रचारासाठी मेहकर, डोणगाव येथे रोडशो काढण्यात आला होता. यावेळी प्रचंड प्रमाणात सामान्य जनता सहभागी झाल्याने रोडशो सुपरहिट ठरला, अन् संदीप शेळके यांचे भाषणही वादळी ठरले.

बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांचा जिल्हाभर झंझावती प्रचार सुरू आहे. सगळ्यात आधी प्रचाराला सुरूवात करून संदीप शेळकेंनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ठिकठिकाणी त्यांचा रोडशो काढण्यात येत आहे. यावेळी सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतोय. गावोगावी शेळके यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान , काल शुक्रवारी निघालेल्या रोड शो दरम्यान जनतेशी संवाद साधताना ते म्हणाले की, प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध तुम्हाला ताकदीने उतरावे लागणार आहे. जिल्ह्याचे भवितव्य घडवण्यासाठी सगळ्यांना आता क्रांती करायची आहे. दादा, भाऊ, साहेबांसाठी नाहीतर सामान्य माणसाच्या विकासासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. धनशक्ती विरुद्ध ही लढाई आहे. 
Advt.👆
तुमच्या पाठबळातून आपल्याला जिल्ह्याच्या विकासाचा ध्येय पूर्ण करायचे आहे. आपण विकासाचीच भूमिका घेऊन वाटचाल करत आहोत. आज जर जिल्ह्याच्या विकासासाठी विचार केला नाही तर भविष्यात अत्यंत भीषण अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा विचार करून मतदानरुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्याचा कायपालट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. असा शब्द यावेळी शेळकेंनी उपस्थित जनसमूहाला दिला. तसेच दिल्लीच्या तख्तावर बुलढाणा जिल्ह्यातील जनसामान्यांचा आवाज आपल्याला बुलंद करायचा आहे असेही शेळके म्हणाले.