जळगाव जामोद तालुक्यात संदीप शेळकेंचा झंझावाती प्रचार दौरा! आसलगाव, पिंपळगाव काळे, खांडवीत रोड शो; शेळके म्हणाले, व्हिजन घेऊन आलोय..

 
जळगाव जामोद: वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. संतनगरी शेगावातून रोड शो करून प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर संदीप शेळके आता जळगाव जामोद तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज,१२ एप्रिलला जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव, पिंपळगाव काळे, खांडवी येथे संदीप शेळके यांच्या रोड शो ला दमदार प्रतिसाद मिळाला. "मी तुमच्याकडे व्हिजन घेऊन आलोय , त्यामुळे परिवर्तनाचे भागीदार व्हा" असे आवाहन यावेळी संदीप शेळके यांनी केले.
संदीप शेळके अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कुठलाही पक्ष नसतांना, कुठलाही राजकीय गॉडफादर नसतांना संदीप शेळके संदीप शेळके यांनी प्रचारयंत्रणा जबरदस्त आहे. ६ विधानसभा क्षेत्रात त्यांच्या प्रचारकार्यालयांचे उद्घाटन झाले आहे. बुलडाणा शहरातील वन बुलडाणा मिशनच्या वॉर रूम मधून शेळके यांच्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन होत आहे.
मी व्हिजन घेऊन आलोय, बाकीचे आरोप प्रत्यारोप करतील...
हल्ली सामान्य मतदारांचा राजकारणावरचा विश्वास उडत चाललाय. राजकीय पक्ष एकमेकांची लक्तरे ओढण्यात व्यस्त आहेत. सकाळी एका पक्षात असलेला पुढारी संध्याकाळी कोणत्या पक्षात जाईल याचा नेम नाही. आरोप, प्रत्यारोप , शिव्याछाप यातच राजकीय नेते गुंतले आहेत. कुणाकडे विकासाचे व्हिजन नाही, १५ वर्षात काय केले याचे उत्तर खासदारांजवळ नाही. मात्र वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून विकासाची चळवळ घेऊन आपण पुढे जात आहोत. जिल्ह्याचा सर्वव्यापी, सर्वस्पर्शी सर्वांगीण विकास हाच आपला अजेंडा आहे. रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांच्या मालाला भाव, महिला सक्षमीकरण, सिंचनसुविधा, पर्यटनविकास यासाठी भरभरून प्रयत्न करायचे आहेत. यावेळी जनतेने मला संधी दिली तर पुढच्या निवडणुकीला प्रचारासाठी येण्याची गरजच पडणार नाही एवढे काम उभे करू असे संदीप शेळके यावेळी म्हणाले.