संदीप शेळकेंच्या प्रचार रॅलीने बुलढाणा शहर दणाणले ; बुलढाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! शेळके म्हणाले, ही गर्दी म्हणजे जनतेने विजयासाठी दिलेले आशीर्वाद.. 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या प्रचारार्थ आज सोमवारी, बुलढाणा शहरात प्रचार रॅली निघाली. यावेळी प्रचार रॅलीत असंख्य बुलढाणेकर सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, ही गर्दी म्हणजे जनतेने विजयासाठी दिलेले आशीर्वाद आहे असे प्रतिपादन शेळके यांनी केले. 
 
Advt.👆
विकासाचे अभ्यासपूर्ण धोरणे घेवून निघालेल्या संदीप शेळकेंना संपूर्ण जिल्हाभरातून प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी, गावोगावी शेळकेंचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. जेसीबिने पुष्पवृष्टी करत शेळकेंप्रती असलेले प्रेम लोक व्यक्त करत आहेत. दरम्यान आज सोमवार, २२ एप्रिलला शेळकेंच्या प्रचारार्थ बुलढाणा शहरात भव्य रॅली निघाली होती. शहरातील व्यवहारे हॉस्पिटल पासून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर संगम चौक , जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक, तहसील चौक , चिंचोले चौक, गजानन महाराज मंदिर परिसर, ते स्टेट बँक चौक येथे प्रचार रॅलीचा समारोप झाला. शहरातील प्रत्येक चौक 'संदीप दादा शेळके तूम आगे बढो' अशा घोषणांनी दणाणून गेला होता.
     यावेळी जनतेशी संवाद साधताना, शेळके यांनी विकासाचे व्हिजन मांडले. जिल्हा विकासामध्ये आघाडीवर असला पाहिजे, बुलढाणा जिल्ह्याच्या रूपाने विकासाचे मॉडेल तयार करण्याचे ध्येय आहे, ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या वैभव प्राप्त असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचा देशभरात नावलौकिक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शेळके म्हणाले. गेली ७६ वर्ष झाली स्वातंत्र्याला आजही बुलढाणा जिल्हा मागासलेपणाच्या यादीत गणल्या जातो, त्यामुळे मागासलेपणाचा कलंक कायमचा पुसून जिल्ह्याचा कायापालट करून दाखवणार असल्याचा विश्वास संदीप शेळके यांनी बोलून दाखविला. ही देशाची निवडणूक आहे, तसेच जिल्ह्याचे भवितव्य घडविणारी आहे. त्यामुळे परिवर्तन घडणार, जनता विकासासाठी मतदान करणार आणि आपला विजय निश्चित आहे असा दावाही शेळके यांनी केला.