संदीप शेळकेंनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजानच्या शुभेच्छा; इफ्तार पार्टीतही  घेतला सहभाग!

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे.  मुस्लिम बांधव दिवसभर रोजा पकडून अल्लाहची  प्रार्थना करतात. तसेच संध्याकाळी इफ्तार पार्टीने  दिवसभराच्या उपवासाची सांगता करतात. दरम्यान, वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी काल  बुलढाण्यातील इंदिरानगर परिसरातील मुस्लिम बांधवां समवेत इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होवून रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. 

 यावेळी इंदिरानगर परिसरातील असंख्य मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. त्यामध्ये   जोहेर याकुब शेख,सैय्यद रशीद ,रियाज ठेकेदार,शेख सलीम,सैय्यद जाकिर,तस्लिम खान,राजु शेख ,अलीम भाई,मुस्ताक शेख,सैय्यद महेबुब,जलील ठेकेदार,शेख गालिब, आबिद सैय्यद, सैय्यद बिजाद,तानाजी पेठने पुर्थ्वी राजपूत,रामु राजपुत,दता जाधव यांची उपस्थित होती. रणरणत्या उन्हात पाण्याचा एक घोट न घेता  दिवसभर रोजा पकडणे ही काही साधी बाब नाही, मात्र अल्लाहा च्या स्मरणाने, प्रार्थनेने एवढी ऊर्जा मिळते. त्यामुळेच हे शक्य आहे. असे संदीप शेळके म्हणाले.