राष्ट्रीय वारकरी सेनेचा श्वेता ताई महाले यांना जाहीर पाठिंबा! "विठ्ठल "म्हणाले ताई "आम्ही "सोबत आहोत ...

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वारकरी परंपरेने स्त्री पुरुष समानतेचा धागा जपला. संत साहित्यामध्ये त्याची उदाहरणे आहेत. मुक्ताबाई ते जनाबाई अशी कितीतरी नाव सांगता येतील. "धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ".... या संत तुकोबांच्या वचनाचे ब्रीद जपत काम करत असलेल्या राष्ट्रीय वारकरी सेनेने चिखली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत श्वेताताई महाले यांना आपल्या 
 पाठिंबा जाहीर केला आहे. 
राष्ट्रीय वारकरी सेनेचे संपर्कप्रमुख विठ्ठल क्षीरसागर यांनी श्वेता ताई महाले यांना पाठिंबाचे पत्र सुपूर्द करत "ताई काळजी करू नका आम्ही सोबत आहोत "असे म्हटले आहे.
  चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळत आहेत. दोन जुने प्रतिस्पर्धी समोरासमोर आले आहेत. प्रचार शिगेला पोहोचत आहे. उमेदवार गल्ली ते गल्ली आणि गाव ते गाव जात असून मतदारांना प्रचारातून मत मागत आहेत. राष्ट्रीय वारकरी सेनेने या निवडणुकीत श्वेताताई महाले यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. विठ्ठल शंकरराव क्षीरसागर हे राष्ट्रीय वारकरी सेनेचे उत्सव समिती जिल्हाध्यक्ष असून ते संपर्कप्रमुख देखील आहेत. त्यांनी श्वेताताई महाले यांना पाठिंबाचे पत्र देखील सुपूर्द केले आहे.