राहुल बोंद्रे आऊट ऑफ रेस! भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस यांची टीका! म्हणाले, बोंद्रेंनी स्वतःच कट रचून घडवून आणला नावे गहाळ करण्याचा डाव...
Oct 20, 2024, 16:17 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार श्वेताताईंच्या विकास कामामुळे त्या या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून येणार आहेत. काँग्रेसचे राहुल बोंद्रे आजघडीलाच स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेले आहेत. त्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ आहेत.म्हणून मतदार यादीतून नावे गहाळ झाल्याचा खोटा आरोप ते करीत आहेत..वास्तविक आमदार श्वेताताईंच्या विरोधात फेक नेरेटीव्ह सेट करण्यासाठी स्वतः राहुल बोंद्रे यांनीच कट रचून हा खोटा डाव घडवून आणला असा गंभीर आरोप भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे..
आमदार श्वेताताईंनी दोन वर्षात मतदार संघात हजारो कोटींची कामे केली. आमदार श्वेताताईंनी केलेल्या कामाच्या १० टक्के कामेही त्यांना आमदारकीच्या दहा वर्षात करता आली नाहीत. गावोगावी दिसत असलेली विकासकामे आणि श्वेताताईंची लोकप्रियता त्यांच्या डोळ्यात खुपते आहे त्यामुळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी राहुल बोंद्रे खोटे नाटे आरोप करीत असल्याचे शेख अनिस यांनी म्हटले आहे.
वास्तविक निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे..डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसारच निवडणूक आयोगाचे काम चालते. स्वतंत्र निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणे हे एक प्रकारे देशाच्या घटनेवर विश्वास नसल्यासारखेच आहे असा हल्लाबोलही शेख अनिस यांनी केला आहे..