अर्थसंकल्पात खामगाव - जालना रेल्वेमार्गासाठी राज्याच्या हिश्याची तरतुद करा! आमदार श्वेताताईंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

 
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खामगाव - जालना रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारच्या हिश्याची तरतूद करावी अशा आग्रही मागणीचे निवेदन आ. श्वेताताईंनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.

 केंद्र सरकारनेही आता खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी पुढाकार घेतला आहे. या मार्गाचे सर्वेक्षणही सुरू झाली असून वाणिज्यिक सर्वेक्षण याआधीच पूर्ण झाले आहे. या या रेल्वेमार्गासाठी सद्यस्थितीत २०१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार त्यांचा वाटा तयार आहे. याआधी महाविकास आघाडी सरकार असताना राज्याने राज्याचा वाटा द्यावा अशी मागणी देखील आ. श्वेताताईंनी विधानसभेत केली होती.

विधानसभेत खामगाव जालना रेल्वे मार्गाचा विषय मांडणाऱ्या आ. श्वेताताई पहिल्या आमदार ठरल्या होत्या. मात्र महाविकास आघाडी सरकारने राज्याचा वाटा देण्यासंदर्भात पुढाकार घेतला नव्हता. आता आ. श्वेताताईंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच त्यासाठीची मागणी केली आहे.