राहुल गांधींच्या सभेसाठी चिखलीत जय्यत तयारी! गांधींना SPG सुरक्षा असल्याने पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर; अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनींच्या नेतृत्वात तब्बल "एवढ्या" पोलिसांचा गराडा...
Nov 11, 2024, 20:48 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांची उद्या चिखली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहे. जाफ्राबाद रोडवरील बोंद्रे यांच्या वीट भट्टीजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात ही सभा होत असून या सभेची जय्यत तयारी आणि सूक्ष्म नियोजन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. १९७८ नंतर पहिल्यांदा गांधी कुटुंबातील सदस्यांची सभा चिखलीत होत असल्याने या सभेकडे जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. दरम्यान राहुल गांधी यांना SPG (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) दर्जाची सुरक्षा असल्याने पोलीस यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आहे...
एसपी. विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्यावर बंदोबस्त प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. मोठा फौज फाटा उद्या चिखली शहरात तैनात राहणार आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सह २ उपविभागीय पोलिस अधिकारी, ७ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी,२४ सपोनि, २६७ अंमलदार आणि २२ अंमलदारांचे १ दंगाकाबू पथक असा बंदोबस्त राहुल गांधी यांच्या सभेसाठी तैनात करण्यात आलेला आहे..
राहुल बोंद्रेनी केली पाहणी...
दरम्यान आज,११ नोव्हेंबरला राहुल गांधी यांच्यासह महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सभास्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला. उद्याची सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे...