BREAKING युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह ५० जणांना पोलिसांनी अडवले; सहकार विद्या मंदिराजवळच ताब्यात घेतले अन् चिखलीला घेऊन निघाले.....

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलडाणा येथे आज संजय गायकवाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन होणार होते. मात्र संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी आंदोलन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. गायकवाड यांच्या समर्थकांकडून प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था हा मुद्दा पुढे करीत पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

दुसरीकडे चिखली येथून बुलडाणा येथे येण्यासाठी निघालेले असतानाच पोलिसांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांचा ताफा सहकार विद्या मंदिराजवळ अडवला. युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस त्यांना चिखली येथे घेऊन जात आहेत.

 
Advt.