मी निवडणूक लढवावी ही जनतेची इच्छा! डॉ.ऋतुजा चव्हाण यांचे प्रतिपादन; गावोगावी सुरू आहेत भेटी - गाठी...

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी नव्या दमाच्या नेतृत्वाची गरज आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी निवडणूक लढवावी वी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी केले आहे..

जाहिरात 👆

डॉ. ऋतुजा चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडीने मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिलेली आहे. त्या आधीपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत. शेतकरी चळवळ आणि सहकार क्षेत्रात कामाचा ठसा उमटवल्यामुळे ऋतुजा चव्हाण आणि ऋषांक चव्हाण या दांपत्याला मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी त्यांचे भेटी - गाठी दौरे सुरू आहेत. २८ ऑक्टोबरला डॉ.ऋतुजा चव्हाण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत...