लोकांनी थेट जनतेतून निवडून दिले! कुवरदेवच्या सरपंचांनी पकडली राष्ट्रवादी काँग्रेसची वाट! कार्यकर्त्यांसह घेतला प्रवेश....
  Nov 23, 2023, 15:28 IST   
                                जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यातील कुवरदेव येथील लोकनियुक्त सरपंचांनी आज राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजित पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.
                                
   जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. काही दिवसाआधी जळगाव जामोद तालुक्यातील कुवरदेव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राजु भुवनसिंग मुजलदा हे थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यांच्यासह भारत भावसिंग चव्हाण, कालु बामन्या, दिलीप मुजलदा, अर्जुन भुरा डूडवा गोमाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.