सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा; भाईजी चांडक यांचे आवाहन; म्हणाले, बांग्लादेशात माणुसकीला काळीमा;

 बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी बुलडाण्यात आक्रोश मोर्चा..! 

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बांग्लादेशात माणुसकीला काळीमा असणाऱ्या घटना घडत आहेत. मात्र याचा कुठे निषेध होतांना दिसत नाही. एरवी एखादी छोटी घटना कुठे घडली तर त्यावर अनेक ठिकाणांहून आवाज उठवल्या जातो, ओरड केली जाते. मात्र बांग्लादेशात सनातन हिंदू धर्माच्या अनुयायांवर एव्हढे अत्याचार होत असतांना निषेधाचे सुर उमटत नाहीत याचे आश्चर्य वाटते असे म्हणत मंगळवारी बुलडाणा येथे बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होत आवाज उठवावा असे आवाहन बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा भाईजी उपाख्य राधेश्यामजी चांडक यांनी केले आहे.
 बांग्लादेशात हिंदू व इतर सर्व अल्पसंख्याकांवर होणाऱ्या जिहादी अत्याचाराच्या निषेधार्थ बुलडाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने १० डिसेंबरला आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता गर्दे सभागृहातून हा मोर्चा तहसील चौक, संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.