परिवर्तन रथयात्रा आज खामगाव तालुक्यात! संदीप शेळके "या" गावांत करणार परिवर्तनाचा जागर..
Mar 9, 2024, 08:05 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वन बुलडाणा मिशनचे संस्थापक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या नेतृत्वात निघालेली परिवर्तन रथयात्रा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संदीप शेळके यांनी जिल्हावसियांना तुम्ही बदल घडवा, मी जिल्हा घडवतो असे आवाहन केले आहे. त्यांच्या परिवर्तन रथयात्रेला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. महिला मेळाव्यानी खामगाव तालुक्यात परिवर्तन रथयात्रा सुरू झाली. आज ९ मार्च रोजी खामगाव तालुक्यातील विविध गावात परिवर्तनाचा जागर होणारआहे.
दिवसभर तब्बल १६ गावांत यात्रा दाखल होणार आहे. त्यामध्ये संदीप शेळके आपल्या भाषणातून जनतेसमोर विकासाचे व्हिजन मांडणार आहेत.
या गावांत होणार "जागर परिवर्तनाचा"!
सकाळी माटरगाव, श्रीधरनगर, वर्णा, रोहणा, तांदुळवाडी, पोरज, या गावांमध्ये यात्रा पोहचणार आहे. त्यांनतर दुपारी निमकवळा, पिं राजा, निपाणा, बोरजवळा हिवरा,भंडारी , भलेगाव येथे. आणि सायंकाळी भालेगाव, काळेगाव, ढोरपगाव, कवडगाव या ठिकाणी परिवर्तनाचा जागर होणार आहे.