पंकजाताई म्हणाल्या, रक्ताच्या नात्यापेक्षा घामाचे नाते मोठे!
सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे भगवान बाबा शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. डॉ. सुनील कायंदे व प्रा. शिवराज कायंदे, शिल्पा कायंदे, धनश्री कायंदे यांनी हेलिपॅडवर पंकजाताईंचे स्वागत केले. अभिष्टचिंतन गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पंकजा मुंडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री महादेवराव जानकर, रणजीत पाटील, भारत बोंद्रे, माजी खासदार सुखदेव काळे, विधान परिषद सदस्य नरेंद्र दराडे, किरण सरनाईक, माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर पवार यांनी केले. आभार किसनराव काळे व प्राध्यापक शिवराज कायंदे यांनी मानले. भव्य कार्यक्रमाचे नियोजन मागील एक वर्षापासून डॉ. सुनील कायंदे करत असून, त्यांनी माझी कार्यक्रमाची डेट एक वर्षापासून घेतली व कार्यक्रमाचे नियोजन अगदी चांगल्या प्रकारे केले याबद्दल त्यांच्या पाठीवर थाप पंकजाताईंनी टाकली. कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर, जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, काँग्रेस नेते श्याम उमाळकर यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याला भेट दिली.