आमची लढाई लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी! राहुल बोंद्रे यांचे प्रतिपादन; माळवंडीत प्रचार दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद...
Nov 14, 2024, 13:49 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढत आहेत, शेतमालाला भाव नाही. मात्र या सरकारला काहीही देणे घेणे नाही. संविधान पायदळी तुडवण्याचे पाप केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार करीत आहे.त्यामुळे ही लढाई लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठीची आहे असे प्रतिपादन चिखली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांनी केली. चिखली विधानसभा मतदारसंघातील माळवंडी येथे राहुल बोंद्रे यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना बोंद्रे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. मात्र महायुती सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. औषधांचा खतांचा खर्च वाढला आहे,त्यामुळे शेतीला लागणारा उत्पादन खर्च आणि उत्पन्न यात मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची क्षमता ही केवळ महाविकास आघाडीतच आहे असेही राहुल बोंद्रे म्हणाले. चिखली विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी २० नोव्हेंबरला पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान रुपी आशीर्वाद देण्याची विनंती ही यावेळी बोंद्रे यांनी केली.