अर्थसंकल्पावर ना.प्रतापराव जाधव म्हणाले,देशाला महाशक्ती बनवणारा! रविकांत तुपकर म्हणाले, हा हेडलाईन्स मॅनेजमेंटचा भाग 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावर दोन्ही बाजूंनी भल्याबुऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. सत्ताधारी हा अर्थसंकल्प प्रगतीचा देशाची वाटचाल पुढे नेणारा देशाला महाशक्ती बनवणारा असल्याचे म्हणत आहेत. तर विरोधी पक्ष मात्र अर्थसंकल्पावर टीका करीत आहेत. केंद्रीय आयुष मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी अर्थसंकल्पाची तोंड भरून स्तुती केली आहे तर ना.जाधव यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी खरपूस भाषेत अर्थसंकल्पाचा समाचार घेतला आहे.
ना.प्रतापराव जाधव म्हणाले की, अबकारी शुल्कातुन काही औषधी वगळ्याचा अर्थ संकल्यातील निर्णय आणि शेती क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटीची तरतुदी सह ग्रामीण व शहरी विकासावर भर देत देशाला महाशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा,लोक कल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचे ना. प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.
    हा अर्थसंकल्प देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. विशेष म्हणजे रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काही औषधांना अबकारी शुल्कातून वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पात या संदर्भाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी केली आहे. त्यामुळे काही औषधीच्या किमतीही कमी होणार असुन त्याचा फायदा सर्वांना होणार असल्याचे ना.
प्रतापराव जाधव अर्थसंकल्पाची बाजू घेताना म्हणाले.मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत करणारा आणि देशाला महाशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा, समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा एक चांगला, दूरदृष्टीपूर्ण, लोककल्याणकारी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे
 
शेती क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची केलेली तरतूद महत्वाची आहे. त्यातून शेती क्षेत्रासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. कमी खर्चात, अधिक उत्पादन देणाऱ्या शास्त्रशुद्ध शेतीचा प्रचार-प्रसार देशाच्या शेतीक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना बळ देणारा ठरणार आहे युवकांना शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी १.४८ लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यातून येणाऱ्या ५ वर्षात २० लाख युवकांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ना.जाधव म्हणाले. पीएम आवास शहरी योजनेंअंतर्गत शहरात राहणाऱ्या १ कोटी गरीब नागरिकांना १० लाख कोटी रुपये खर्चून बांधून देण्याचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे ठारणारा आहे. मी या निर्णयाचेही स्वागत करतो असेही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे 
पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे मानले आभार
काही औषांधावरील अबकारी शुल्कातुन वगळ्याचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पामध्ये नमूद करण्यात आला आहे त्यामुळे औषधावरील किमतीत कमी होऊन त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे केंद्रीय आरोग्य व कुंटब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार मानले आहे...
रविकांत तुपकर म्हणाले हा हेडलाईन मॅनेजमेंट चा भाग...
   प्रत्येक बजेट मध्ये कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले गेले आहे, असे म्हटले जाते तर मग शेतकऱ्यांची परिस्थिती का सुधारत नाही...? शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढच होत आहे. त्यामुळे आजच्या केंद्राच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी काही पडेल असे वाटत नाही, डाळ तेलबिया क्षेत्रात स्वयंपूर्णतेवर भर देण्याची घोषणा अर्थ संकल्पात करतात... तर दुसरीकडे डाळ तेलबिया आयत करून देशातील सोयाबीन सारख्या शेतमालाचे भाव पडतात, ही दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणे आजचा अर्थसंकल्प देखील फक्त हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग असल्याची प्रक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे.