आता कोणतीही शक्ती जयश्रीताईंचा विजय रोखू शकत नाही! शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवतांचे प्रतिपादन...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार शेतकऱ्यांना मरणाच्या खाईत लोटणारा आहे. सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी दहशतीचे राजकारण विरोधकांकडून केले जात आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाने गेल्या ५ वर्षांत गुंडगिरी आणि हुकूमशाहीचा राजकारण बघितले आहे..मात्र आता हुकूमशाहीचा अंत जवळ आला असून निष्ठावान शिवसैनिकांनी आता जयश्रीताई शेळके यांच्या विजयाचा निर्धार केलेला आहे..त्यामुळे शिवसैनिकांची प्रचंड ताकद सोबत असताना आता कोणतीही शक्ती जयश्रीताईंचा विजय रोखू शकत नाही असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी केले..

काल,३ नोव्हेंबरला बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारार्थ बुलडाणा तालुक्यातील पाडळी, पळसखेड, दत्तपुर, उमाळा या गावांत प्रचारदौरा संपन्न झाला. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना जालिंदर बुधवंत बोलत होते. यावेळी उमेदवार जयश्रीताई शेळके, शिवसेना नेते संदीप शेळके, दत्तात्रय लहाने, तालुकाप्रमुख लखन गाडेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना जालिंधर बुधवंत म्हणाले की, बुलडाणा विधानसभा मतदारसंघाने गेल्या ५ वर्षांत काय सहन केलं हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या बुलडाण्याची ओळख मिटवण्याचे काम सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचे ते म्हणाले. मात्र बुलडाणा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे, त्यामुळे २० नोव्हेंबरला जयश्री ताईच्यापदरात भरभरून मतांचे दान पडेल असेही ते म्हणाले..