ना. प्रतापरावांचा कामावर फोकस; संध्याकाळी उशिरापर्यंत घेतली आढावा बैठक; शेतकरी पीकविम्यायासून वंचित राहू नये, शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचवण्याचा दिल्या सूचना..
केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव हे काल जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले. यानंतर दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. संध्याकाळी उशिरापर्यंत ही बैठक चालली. याप्रसंगी, सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते. आरोग्य, कृषी, पीक कर्ज, आपत्ती व्यवस्थापन, वीज वितरण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना अश्या विविध योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. संबंधित विभागातील रखडलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश ना. जाधव यांनी अधिकाऱ्याला दिले. जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा पासून वंचित राहू नये, खताचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने विशेष काळजी घ्यावी तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कामे रक्षाबंधन पूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही ना. जाधवांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, आ. रायमुलकर उपस्थित होते.