आमदार रायमुलकरांचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही! यंदा सर्वच रेकॉर्ड मोडीत काढणार! युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांचा विश्वास; विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन...

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यावेळेला रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील.आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड या निवडणुकीत मोडीत निघतील. आता डॉ. रायमुलकर यांचा चौफेर उधळणारा विजयाचा विकासरथ कुणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिध्दीपत्रकात पुढे म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात डॉ.संजय रायमुलकर यांनी मेहकर मतदारसंघाचा चौफेर विकास केला. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकासाला आणखी गती मिळाली. डॉ.संजय रायमुलकर हे हाक दिल्यावर थांबणारे आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे नेतृत्व आहे.

त्यामुळे यावेळी देखील डॉ.संजय रायमुलकर यांचा विजय निश्चित आहे.विरोधकांकडे बोलायला काही नसल्याने ते काहीही बोलत सुटतील मात्र खोट्या भुलथापांना बळी न पडता पुन्हा एकदा डॉ. संजय रायमुलकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकातून ऋषी जाधव यांनी केले आहे.