ना.गुलाबराव पाटील आज जिल्ह्यात! खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ धामणगाव बढे येथे घेणार जाहीर सभा
Apr 18, 2024, 07:33 IST
बुलडाणा: राज्याचे पाणीपुरवठा मंत्री, शिवसेनेचे फर्डे वक्ते ना.गुलाबराव पाटील आज, १८ एप्रिलला बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. बुलडाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ धामणगाव बढे येथे ना. पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला ते संबोधित करणार आहेत.
Advt. 👆
खा.प्रतापराव जाधव यांनी प्रचारात दमदार आघाडी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाण्यात महायुतीचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी खा. प्रतापराव जाधव सहज चौकार मारणार असल्याचे वक्त्यव केले होते. मेहकर तालुक्यातील मोहना आणि सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे झालेला बंजारा समाजाचा मेळावा देखील लक्षवेधी ठरला होता. आता ना.गुलाबराव पाटील खा.जाधव यांच्या प्रचारार्थ धामणगाव बढे येथे जाहीर सभा घेणार आहेत. खा.प्रतापराव जाधव, आ.संजय गायकवाड हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. खा.जाधव यांच्या प्रचारासाठी ना.पाटील तिसऱ्यांदा आज तिसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहेत. धामणगाव बढे येथील ग्रामपंचायत समोरील मैदानात सायंकाळी ६ वाजता ना.पाटील यांची सभा होणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.