राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने श्वेताताईंसोबत! शंतनु बोंद्रे यांचे प्रतिपादन; म्हणाले, श्वेताताई विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व! श्वेताताईंमुळेच शहराचा पाणीप्रश्न मिटणार...
Oct 24, 2024, 14:21 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. चिखली शहराचे रूपडे श्वेतातांईमुळे बदलले आहे. चिखली शहराची सर्वात मोठी असलेली पाण्याची समस्या श्वेताताईंनी निकाली काढली आहे. श्वेताताई या विकासाचे व्हिजन आणि दूरदृष्टी नेतृत्व असल्याने २० ऑक्टोबरला पुन्हा एकदा श्वेता ताईंच्याच पारड्यात आपले बहुमूल्य मत द्या असे आवाहन करीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने श्वेताताईसोबत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे यांनी केले.चिखली शहरात महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले यांच्या गाठी - भेटी दौऱ्यात प्रभाग क्रमांक ४ मध्ये आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. यावेळी महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी प्रभागातील नागरिक उपस्थित होते..
पुढे बोलतांना शंतनु बोंद्रे म्हणाले की, चिखली शहरात भीषण पाणीटंचाई होती. एखाद्याची मौत झाली असेल आणि मध्येच नळ आले तर सगळ काम सोडून देऊन आधी लोक पाणी भरायचे..कारण महिना महिना नळाला पाणी येत नव्हते. १९९५ ला भारतभाऊंनी पेनटाकळी प्रकल्पाचे काम केले. मात्र त्यानंतरच्या लोकप्रतिनिधींच्या दूरदृष्टी अभावी शहराची पाणी - समस्या कायम होती. मात्र आता श्वेताताईंच्या प्रयत्नांतून १२३ कोटींची नळयोजना दररोज चिखलीकर यांच्या घरात पाणी पोहोचवणार आहे. विकासाचे व्हिजन असल्याशिवाय विकास होऊ शकत नाही आणि आमदार श्वेताताई या विकासाचे व्हिजन असलेल्या लोकनेत्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला श्वेताताईच आमदार पाहिजे असेही शंतनु बोंद्रे म्हणाले...