नरेंद्र खेडेकरांच्या आशेवर पाणी! उध्दव ठाकरेंच्या मनात काय? उमेदवारीची घोषणा केलीच नाही

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. सिंदखेडराजा येथे उध्दव ठाकरेंनी जनसंवाद मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यात ते बुलडाणा लोकसभेसाठी उमेदवारीची घोषणा करतील अशी चर्चा होती, मात्र उध्दव ठाकरेंनी उमेदवारीची घोषणा न केल्याने नरेंद्र खेडेकर यांच्या आशेवर सध्यातरी पाणी फेरल्या गेले. आता मेहकरच्या सभेत उद्धव ठाकरे उमेदवारीची घोषणा करतात की हा विषय पुन्हा लांबणीवर टाकतात याकडे राजकीय वर्तुळाचे लागून आहे.
 
                              Add. 👆
उबाठा शिवसेनेकडून बुलडाणा लोकसभा लढण्यासाठी नरेंद्र खेडेकर इच्छुक आहेत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत उबाठा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ आहे. याआधी उध्दव ठाकरे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून खा.ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून देखील ते उमेदवाराची घोषणा करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, मात्र उध्दव ठाकरेंच्या मनात नेमके काय चालू आहे हे भल्याभल्यांना सुद्धा कळेनासे झाले आहे. आता शिंदेगटात गेलेल्या खा. प्रतापराव जाधवांचा गड असलेल्या मेहकरच्या सभेत उद्धव ठाकरे उमेदवारी जाहीर करतात का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत..