नारायण राणे ३१ ऑक्टोबरला चिखलीत!
Oct 29, 2021, 17:20 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे ३१ ऑक्टोबरला जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः सकाळी ११ वाजता मुंबई येथून खासगी हेलिकॉप्टरने चिखलीकडे प्रयाण, दुपारी १ वाजता चिखली येथे श्री अंबिका अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी हेलीपॅड येथे आगमन व डॉ. आशुतोष गुप्ता यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण, दुपारी २ वाजता रानवारा मंगल कार्यालय, गुप्ता गार्डन, जाफराबाद रोड चिखली येथे चिखली अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकेतर्फे आयोजित उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिरास उपस्थिती, दुपारी साडेतीनला रानवारा मंगल कार्यालय येथून मोटारीने श्री अंबिका अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी पावणेचारला हेलीपॅड येथे आगमन व खासगी हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.