ग्रामीण भागातील माय माऊल्या म्हणतात " आमच्या डोक्यावरचा हंडा उतरवणाऱ्या श्वेताताईंनाच पुन्हा आमदार करणार"! २ अब्ज रुपयांच्या निधीतून मिटली १३५ गावांची तहान....

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):पाण्याशिवाय मानवाचे जीवन निरर्थक आहे. पाण्याचा सर्वात मोठा उपयोग पिण्यासाठी होतो, मात्र चिखली विधानसभा मतदारसंघात आजवर ग्रामीण भागातील जनतेला पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत असे. हे चित्र बदलण्याचा संकल्प आ. श्वेताताई महाले यांनी केला व केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेची चिखली मतदारसंघात अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील पाणी समस्येला पूर्णपणे मिटवण्याचा चंग बांधला. या प्रयत्नांचे फळ म्हणून आज अनेक गावात पाण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. यापूर्वी दहा वर्षे आमदारकी उपभोगलेल्या नेत्याने आपला पाणी प्रश्न मुळीच सोडवला नाही, मात्र श्वेताताईंनी यात लक्ष घातल्याने आपल्याला पाणी समस्या सुटत आहे याची जाणीव ठेवत ग्रामीण भागातील मायमाऊल्या श्वेताताईंच्या या कार्याचे तोंड भरून कौतुक करत आहेत. म्हणूनच " आमच्या डोक्यावरचा हंडा उतरवणाऱ्या श्वेताताईंनाच आम्ही पुन्हा आमदार बनवणार " अशी ग्वाही गाव खेड्यातली माता भगिनी देताना आढळतात. 

 आपल्या मतदारसंघात कायमस्वरूपी मतदारांच्या संपर्कात असलेल्या आमदार श्वेताताई महाले सातत्याने जनतेच्या समस्यांचा वेध घेत असतात. प्रत्येक प्रश्नाचे योग्य प्रकारे आकलन करून शासकीय कार्यपद्धतीनुसार त्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करत तो प्रश्न सोडवण्याची श्वेताताईंची कार्यशैली आहे. ग्रामीण भागात फिरत असताना येथील सर्वात मोठी समस्या असलेल्या पाणी प्रश्नाकडे श्वेताताईंनी गांभीर्यपूर्वक पाहिले व हा प्रश्न सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. ग्रामीण भागातील पाणी समस्येचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन या योजनेची आ. श्वेताताई महाले यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात अतिशय उत्तमपणे अंमलबजावणी केली. 

सुमारे दोन अब्ज रुपयांच्या निधीमधून १३५ गावे होणार ' तहान मुक्त '
        
 जलजीवन मिशन या केंद्र शासनाच्या योजनेतून आ. श्वेताताई महाले यांनी चिखली मतदारसंघातील १३५ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न नेहमीसाठी निकाली काढला असून तब्बल १ अब्ज ९८ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. मंजूर झालेल्या १२२ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर असून उर्वरित कामे देखील प्रगतीपथावर आहेत. जलजीवन मिशन योजना ज्या ज्या गावात राबवली जात आहे तेथे आता लवकरच नळ योजनेद्वारे घराघरात पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. याद्वारे गाव खेड्यातल्या आई बहिणींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरवण्याचा आपला संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने आ. श्वेताताई महाले यांची दमदार वाटचाल सुरू आहे.