महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्यपदी मृत्युंजय संजय गायकवाड यांची निवड! 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) 
 युवासेनेच्या कार्यकारणी सदस्यपदी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे.
 
Advt. 👆
शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खा. श्रीकांत शिंदे तथा युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांना सदर पदाची नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.