आमदार श्वेताताई अन् विद्याधर महालेंचा आज चिखलीत सत्कार सोहळा! राजपूत समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल विद्याधर महाले यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले आहे. चिखली येथे राजपूत समाजाच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे..दुपारी १.३० वाजता एमआयडीसी मधील हॉटेल रामा रिसॉर्ट मध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे..

सलग दुसऱ्यांदा चिखली विधानसभा मतदारसंघात श्वेताताईंनी विजयश्री खेचून आणली. दुसरीकडे विद्याधर महाले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खाजगी सचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्ताने राजपूत समाजाच्या वतीने महाले दांपत्याच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे...