आमदार श्वेताताई महाले म्हणतात,भक्कम तरुणाई हेच उद्याचे भविष्य !सुदृढ तरुणाईसाठी व्यायाम शाळांची अन् सुदृढ मनासाठी अभ्यासिकांची शृंखला!
मतदारसंघात दिला १० कोटींचा निधी...

 
 चिखली:(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सगळ्या संपत्तीमध्ये खरी आणि श्रेष्ठ संपत्ती जर कुठली असेल तर ती शरीर संपत्ती. जीवनामध्ये निरोगी राहणे फार महत्त्वाचे आहे. देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईला सुदृढ बनवणे गरजेचे असल्याने त्यांच्यामध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी गावोगावी व्यायाम शाळा उभारणीचं काम चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता ताई महाले यांनी पुढाकार घेऊन पूर्ण केला आहे. याशिवाय सुदृढ मनासाठी गावोगावी अभ्यासिकांसाठी देखील आमदार श्वेताताईंनी निधी उपलब्ध करून दिला आहे. "भक्कम आणि सुदृढ तरुणाई हेच उद्याची महासत्ता असलेल्या भारताचे भविष्य "असल्याचे प्रतिपादन आमदार श्वेताताई महाले यांनी केले आहे.

शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे. मात्र स्पर्धेच्या युगामध्ये बहुतांश नागरिक व्यायामा पासून दूर जात आहेत. परिणामी आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. देशाचं भविष्य जे तरुण पिढी आहे, यांच्यामध्येही आजाराचे प्रमाण हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. मोबाईलचा अतिवापर, व्यसनाचे प्रमाण त्यामुळे तरुणांमध्ये मृत्यू प्रमाणही वाढत आहे. ही पिढी खऱ्या अर्थाने सुदृढ झाली, तरच आपला देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो;आपले योगदान देऊ शकतो. यासाठी प्रत्येकाने व्यायाम करणे गरजेचे असल्याने चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले यांनी आपल्या युवा पिढीतील भावांसाठी व्यायामाची साधने आणि सुविधा पुरवले आहेत. बदलत्या जीवनशैलीमध्ये आज आरोग्याच्या अनेक समस्या उभे राहत आहेत म्हणून व्यायामाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवणे गरजेचे आहे. विकास म्हणजे केवळ रस्ते आणि पुल, सभागृह एवढ्या पुरताच मर्यादित न राहता चौफेर आणि सर्वांगीण विकासाची व्याख्या स्पष्टपणे निदर्शनास आणून देत आमदार श्वेताताई महाले यांनी चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये पाच वर्षात नियोजनबद्ध काम केले आहे. आरोग्य विषयक समस्या असतील , गरजू रुग्णांच्या  शस्त्रक्रिया मोठ्या इस्पितळात  मोफत करून आणणे असो , स्मशानभूमीची काम असो , सिंचन सुविधेच्या बाबतीत वैनगंगा- नळगंगा मध्ये पैनगंगा पर्यंतचा मागणीचा टप्पा असो असे अनेकविध प्रश्न त्यांनी हाताळले. गावोगावी व्यायाम शाळांसाठी निधी देत ती कामे मार्गी लावल्याने आज गावातील तरुण आपला शरीर कसदार करण्यासाठी घाम गाळत आहेत. श्वेताताईच्या पुढाकारातून  हे शक्य झाल्याच्या प्रतिक्रिया तरुण वर्गांमधून येत आहेत.

*३२ गावांमध्ये व्यायामशाळा अन् अभ्यासिका*

 व्यायाम शाळा आणि अभ्यासिकांच्या सुविधा शहरात सहज उपलब्ध होतात. मात्र खेडोपाडी अनेक तरुणांना या सुविधांपासून वंचित राहावे लागते. कष्ट करण्याची जिद्द असताना देखील सुविधा उपलब्ध होत नसल्याने तरुणांना स्पर्धेत अपेक्षित यश मिळत नाही. हेच हेरून आमदार श्वेता ताईंनी ग्रामीण भागांना या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू केला. अलीकडील अडीच वर्षांत चिखली विधानसभा मतदारसंघातील ७ जिल्हा परिषद सर्कल मधील ३२ गावांमध्ये व्यायामशाळा, अभ्यासिका अशी कामे झाली आहेत. अनेक गावांमध्ये क्रीडांगणाचा प्रश्नही सपाटीकरण करून आमदार श्वेताताईंनी मार्गी लावला. 

*या गावांमध्ये झाली कामे.*

 गोद्री ,सोनेवाडी ,सातगाव भुसारी ,पळसखेड दौलत ,चांधई, ढंगारपुर, सावळी, इरला, मौढाळा, भडगाव, दुधा, मातला, कुलूमखेड, अटकळ, गांगलगाव, उदयनगर, हरणी, करवंड, धोडप, शेलसुर, शेलोडी, शिंदी हराळी, म. खंडाळा, सोमठाणा, बोरगाव वसू, दिवठाणा, उत्रादा, सवणा, भोरसा-भोरसी,नायगाव बु, तेल्हारा, धानोरी, अमडापूर, कव्हळा, महिमळ, पांढरदेव या  गावांसह चिखली शहरात क्रीडा व अभ्यासिका या विषयांसाठी श्वेताताईंनी जवळपास १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

*व्यायामशाळेमुळे  गावात तरुण एकवटला*

गावात व्यायाम शाळा उभारण्यात आली त्यात साहित्य देखील मिळाले त्यामुळे गावातील तरुण सकाळ संध्याकाळ एकत्र येऊ लागले. मिल्ट्री भरती, पोलीस भरती यासाठी धावण्याच्या प्रॅक्टिससह शरीर संपदा  कमावण्यावर  देखील तरुण परिश्रम घेत आहेत अशी प्रतिक्रिया..... यांनी दिली.