आमदार डॉ. संजय रायमुलकरांचा विजयरथ चौफेर धावणार! शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारींचा विश्वास; म्हणाले, महिना-दोन महिन्यापूर्वी उगवलेल्यांना जनता उभी देखील करणार नाही...
Oct 27, 2024, 09:45 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या १५ वर्षांत डॉ.संजय रायमुलकर यांनी मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास केला. सामान्य माणसांना सहज उपलब्ध होणारा माणूस म्हणून आ. रायमुलकर यांची ओळख आहे. ना.जाधव यांचा विश्वास प्रत्येक कामात आ. डॉ. रायमुलकर यांनी सार्थ ठरवला.त्यामुळे यावेळीही आमदार संजय रायमुलकर यांचा विजयरथ चौफेर धावणार आहे यात तिळमात्र शंका नाही असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना व्यक्त केला.
मेहकर लोणार ची माती शिवसैनिकांना जपणारी आहे. आ.डॉ.संजय रायमुलकर हे हाडाचे शिवसैनिक आहेत. गावागावात शिवसेना उभारण्यात त्यांचे योगदान आहे. वैचारिक लढाईत त्यांनी हिंदुत्वाचा विचार जपणाऱ्या शिवसेनेला साथ दिली. दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात नकली लोक आहेत.ज्यांचा या मतदार संघाशी काहीही संबंध नाही. महिना दोन महिन्यापूर्वी मतदार संघात उगवलेल्यांना जनता उभी देखील करणार नाही. डॉ.संजय रायमुलकर यांनी केलेल्या विकासकामांना जनता समर्थ साथ देणार असल्याने यंदाचा विजय रेकॉर्ड ब्रेक होईल असे ते म्हणाले...