आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश!विद्यार्थ्यांच्या अडचणी झाल्या दूर! बुलडाणा आगाराला मिळाल्या पहिल्या टप्प्यात दहा एसटी बस..!
बुलडाणा आगाराची अवस्था खूपच बिकट अशी होती. बुलडाणा आगारास ११० गाड्या मंजूर असताना केवळ ५८ गाड्या कार्यरत असल्याची महिती आहे. त्यातही अनेक नादुरुस्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सकाळी सकाळी शाळेत येण्यासाठी अनेक अडचण येते होत्या. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबास एसटी हाच मोठा आधार वाटतो. तर एसटी विभागाकडे वाढीव बसेस नसल्याने फेऱ्यांचे संख्या मर्यादित झाली होती. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात याचा फटका सर्वाधिक विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना बसत होता. याबाबत पालक वर्गातून फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती. याबाबत आमदार संजय गायकवाड यांच्याकडे तक्रार करण्यात आली असता, त्यांनी मुंबई येथे राज्याच्या आगार व्यवस्थापक प्रशासनाची भेट घेऊन बुलडाण्याला ४० बसेस मंजूर करून घेतल्या. मिळालेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपुर्ण राज्यासाठी तब्बल सात हजार नव्या एसटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुशंगाने आमदार संजय गायकवाड यांनी यातील ४० एसटी बससे जिल्हयासाठी देण्याची मागणी केली आहे. या मागणीला आज पहिल्या टप्यातील १० एसटी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी सदर एसटी बस चे उद्घाटन करीत त्याला हिरवी झेडी दिली.
आ.गायकवाड म्हणाले....
बुलडाणा मतदार संघातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी सुविधा मिळत नव्हत्या . ग्रामीण भागात गेल्यानंतर तेथील मुले मुले सातत्याने प्रश्न विचारत होते आमच्या गावात एसटी येत नसल्याने शिक्षणाची अडचण आहे. तर इकडे गाड्या नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या सोय होऊ शकली नाही. कोरोना काळात तर हा व्यवसाय बंद पडला होता. बुलडाणा आगाराची परिस्थिती पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एसटी बसची मागणी रेटली होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाला तब्बल ७००० बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच राज्यात गाडया मिळणार असल्याची माहिती दिली होती. हा निर्णय झाल्यानंतर आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. तसेच एस टी विभागाचे एमडी शेखर चणे यांच्याही संपर्कात होतो. त्यांना सातत्याने सांगितले की बुलडाण्यात ताबडतोब आम्हाला एसटी बस हवे आहेत. ताबडतोब गाडया पाठवा. त्या अनुशंगाने मागणी यश मिळाल्याचे आ.गायकवाड म्हणाले.