शिवसेनेच्या महिला सेना जिल्हाप्रमुख पदी मायाताई म्हस्केंची नियुक्ती! शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून निघालेले नियुक्तीपत्र ना.जाधवांनी सोपवले...

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना महिला सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी मायाताई म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही नियुक्ती करण्यात आली असून त्याचे नियुक्तीपत्र केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी मायाताई म्हस्के यांना सुपूर्द केले.
 आतापर्यंत मायाताई म्हस्के यांच्याकडे महिला सेना चिखली तालुका प्रमुखपदाची जबाबदारी होती. ती जबाबदारी समर्थपणे सांभाळल्यानंतर त्यांच्याकडे आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. बुलडाणा, चिखली, सिंदखेडराजा आणि मेहकर या ४ विधानसभा मतदारसंघात शिवसेना महिला सेनेचे संघटन उभारण्याचे काम आता मायाताई म्हस्के यांना करावे लागणार आहे. शिवसेना नेतृत्वाने सोपवलेली जबाबदारी १०० टक्के प्रामाणिक उद्देशाने पार पाडू असा विश्वास मायाताई म्हस्के यांनी केला. ना.प्रतापराव जाधव यांनी नवीन जबाबदारीसाठी सौ.म्हस्के यांना शुभेच्छा दिल्या आहेत.