चिखली नगरपालिका निवडणूकीत मविआचीच निर्विवाद आघाडी; काशिनाथ आप्पा बोंद्रे यांना सर्वच समाजघटकांचा व्यापक पाठिंबा !

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने (मविआ) चिखली शहरात जोरदार मोर्चेबांधणी केली असून, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या प्रचाराला प्रभाग १ ते १४ मधून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मविआची आघाडी दिवसेंदिवस अधिक भक्कम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील सर्व समाजघटक, व्यावसायिक, महिला, युवा, संघटना, तसेच विविध सामाजिक संघटनांनी बोंद्रे यांच्या नेतृत्वाला खुले समर्थन दर्शविल्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रचाराच्या प्रारंभापासूनच काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या शांत, स्वच्छ चरित्र, सोज्वल चेहरा, दयावान व्यक्तिमत्व व अभ्यासू प्रतिमेबद्दल चिखलीकरांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. विविध समाजवर्गातील नागरिकांशी होणाऱ्या संवाद सभांमध्ये विकासकामांची सलगता, सुसंवादी प्रशासन, तसेच पक्षीय वैमनस्य बाजूला ठेवून ‘शहर प्रथम’ या भूमिकेने बोंद्रे यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. महिला बचतगट, तरुण मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक वर्ग यांच्यातून येणाऱ्या मतमतांतरांमध्येही महाविकास आघाडीबाबत एकसंधता दिसून येत आहे.
प्रभागनिहाय प्रचारसभांना अभूतपूर्व प्रतिसाद
मविआच्या प्रचार बैठका प्रभाग १ ते १४ मध्ये मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी सादर केलेला विकास आराखडा, शहराच्या मूलभूत गरजांवरील उपाययोजना आणि पुढील पाच वर्षांचे ध्येय–धोरण नागरिकांनी मनापासून स्वीकारले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्थापन, ड्रेनेज यांसारख्या प्रश्नांवर नेमकेपणाने मांडलेली भूमिका,सार्वजनिक आरोग्य सुविधा वाढविण्याचा संकल्प,तरुणांसाठी रोजगारकेंद्रित उपक्रम महिलांसाठी सुरक्षित व सुसज्ज शहराची कल्पना
या मुद्द्यांमुळे सभास्थळी गर्दी उसळत असून विरोधकांच्या तुलनेत मविआचा प्रचार अधिक संघटित व योजनाबद्ध दिसत आहे.
काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास
पूर्वी नगराध्यक्षा सौ. प्रियाताई बोंद्रे यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची सकारात्मक छाप आजही शहरात आहे. त्या कामांना पुढे नेण्यासाठी सक्षम, अनुभवी आणि व्यापक संपर्क असलेले नेतृत्व म्हणून काशिनाथ आप्पा बोंद्रे यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.मतदारांच्या अपेक्षा स्पष्ट आहेत,भांडणं नकोत, ठोस विकास हवा! आणि त्यासाठी मविआच्या काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्यावर लोकांचा दृढ विश्वास दिसून येत आहे.