ग्रामीण भागात शाश्वत विकासासाठी विजयाची मशाल पेटवा! शिवसेना जालिंदर बुधवंत यांचे आवाहन! गुम्मी सर्कल मध्ये पार पडला प्रचार दौरा....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने दिखाऊ पेक्षा मजबूत आणि शाश्वत विकास साधण्यासाठी, सिंचनाच्या सुविधेसाठी विजयाची मशाल पेटवा. उद्धव ठाकरे साहेबांनी दोन लाखापर्यंत मुख्यमंत्री झाल्या झाल्या कर्जमाफी दिली होती. त्यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीचा शब्द दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी विजयाची मशाल पेटवा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले. 

  बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार `सौ.जयश्रीताई शेळके` यांच्या प्रचारार्थ आज १४ नोव्हेंबरला गावभेट दौरा पार पडला. यावेळी गावागावात जाऊन जालिंदर बुधवत व सहकारी यांनी जयश्रीताई शेळके यांना विजयी करण्याचे आवाहन केले. गुम्मी पंचायत समिती मधील पाडळी, गिरडा, गोंधनखेड, ईजलापुर, जनूना, मढ, गुम्मी तराडखेड या गावात प्रचार दौरा आयोजित केला होता. याप्रसंगी उपरोक्त गावातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते, ग्रामस्थ यांना भेटुन सौ जयश्रीताई शेळके यांच्या मशाल या निशाणी समोरील २ नंबरचे बटण दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या बुलढाणा येथे पार पडलेल्या अति विराट सभेनंतर गावागावात उत्साहाचे वातावरण आहे. शेतकरी बांधव अडचणीत आहेत. अस्मानी आणि सुलतानी कारभाराचा फटका बसलेला असताना महाविकास आघाडी कडून आणि उद्धव साहेबांकडूनच शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत असेही यावेळी जालिंदर बुधवत म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी जयश्रीताई शेळके यांच्या रूपाने विजयाची मशाल पेटवा असे कळकळीचे आवाहन कॉर्नर बैठका, गावभेट दौऱ्यात जालिंदर बुधवत यांनी केले.

    या प्रचार दौऱ्यात पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर आघाव, व्ही.आर. चव्हाण , उप तालुका प्रमुख विजय इतवारे, युवासेना उप जिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, तालुका प्रमुख संजय शिंदे, मा सरपंच समाधान बुधवत, दिपक पिंपळे, रवी गोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.