बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या हक्काची आणि पत्रकारांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं काम करत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्य नोंदणीला नव्याने सुरुवात झाली आहे. यासाठी सर्व पत्रकारांनी स्वतः पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे.
पारदर्शीपणे ही सदस्य नोंदणी होत असून ऑनलाइन स्वरूपातील स्कॅनर आपल्याकडे संघटनेच्या अधिकृत माध्यमातून पाठवण्यात आलेले आहे. या स्कॅनरवर आपली रक्कम पाठवावी. काही तांत्रिक अडचण आल्यास श्रीकृष्णा सपकाळ यांच्या या क्रमांकावर (8698474062) फोन पे करून त्याचा स्क्रीन शॉट, आपले पूर्ण नाव पत्ता त्याखाली नमूद करून याच नंबर वर पाठवावा जेणेकरून आपली नोंद घेण्यात येईल. व्हाईस ऑफ मीडियाच्या काल परवा झालेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सदस्य नोंदणी अभियान गतीने राबवण्याचे ठरवण्यात आले. राज्य देश नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली संघटना काम करत आहे. प्रकारांच्या दृष्टीने पंचसूत्री कार्यक्रम राबवत असून यासाठी संघटनेच्या अधिकृत सदस्यांना आणखी बळकटी मिळावी. आपला एकजूटपणा भक्कम असावा. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाचे सदस्यरुपी योगदान संघटनेसाठी असावे म्हणून हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्यामुळे अनिल म्हस्के यांनी सांगितले आहे की,
आपल्याला सदस्य नोंदणी अत्यंत तातडीने करणे आवश्यक आहे..१२ डिसेंबरच्या सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत सदस्य नोंदणीची मुदत आहे..ज्यांची नोंदणी झाली त्यांनाच संघटनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व योजनांचा लाभ देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.त्यामुळे सदस्य नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. आपली संघटना ही मिरवण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. सदस्य नोंदणी फी प्रत्येकी ५०० रुपयेअसून ती रक्कम खाली दिलेल्या स्कॅनर वर टाकावी.ज्यांना स्कॅनर वर टाकण्यात तांत्रिक अडचण निर्माण होत आहे त्यांनी श्रीकृष्णा सपकाळ 8698474062 किंवा नदीम शेख 9766693678 या क्रमांकावर रक्कम फोन पे करावी. रक्कम पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट, आपले नाव , पत्ता, मोबाईल नंबर , वृत्तपत्र किंवा चॅनलचे नाव 8698474062 या क्रमांकावर व्हाट्सअप करावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.