BREKING जिल्ह्यात एलसीबीची मोठी कारवाई! ४ देशी पिस्टल,१७ राऊंड जप्त!चौघांच्या आवळल्या मुसक्या; मध्यप्रदेशातून जळगाव जामोद मध्ये आले होते..
Apr 19, 2024, 09:48 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री मोठी कारवाई केली आहे. मध्यप्रदेशातून जळगाव जामोद तालुक्यातील शस्त्रे विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे त्यांच्या ताब्यातून ४ देशी पिस्टल १७ राऊंड एक मोटर सायकल तीन मोबाईल व ३२,३७० रोख असा एकूण २ लाख १३ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
मध्यप्रदेशातील पाचोरी येथून काही व्यक्ती येणार असून देशी बनावटीच्या पिस्टलची डील करणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून एलसीबी व सोनाळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. भारसिंग मिसऱ्या खिराडेव, हिरचंद गुमानसिंग उचवारे, आकाश मुरलीधर मेश्राम, संदीप अंतराम डोंगरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.