शहीद जवान राहुल इंगळेंच्या स्मृतीप्रीत्यर्थ भालगावात आज कीर्तन! आमदार श्वेताताईं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक चित्तरंजन राठींसह मान्यवर राहणार उपस्थित..
 

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील भालगाव येथील वीर जवान राहुल इंगळे यांना गेल्यावर्षी २१ जून रोजी दिल्लीत कर्तव्यावर असताना वीरमरण आले होते.आज, त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने भालगावात कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
कीर्तनकार, भागवताचार्य ह.भ. प सुनील महाराज गाडेकर यांचे कीर्तन संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत होणार आहे. भालगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्र्वेताताई महाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक चित्तरंजन राठी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव विद्याधर महाले, त्रिदल सैनिक सेवा संघाचे तालुकाध्यक्ष जय सियाराम, त्रिदल महिला शक्ति आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ.अलका इंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  तालुका संघचालक शरद भाला, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गजानन मोरे, वसंतराव गाडेकर यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे. कीर्तनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.