खा.प्रतापराव जाधवांनी जिल्हावासियांना रामनवमीच्या शुभेच्छा! म्हणाले, राममंदिरासाठी अनेक पिढ्या खर्ची पडल्या, आपली पिढी भाग्यवान! रामराज्य टिकवून ठेवण्याची क्षमता मतदानात... 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अयोध्येमध्ये राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर , देशात प्रथमच साजरा होणाऱ्या श्रीराम नवमीच्या निमित्ताने बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री प्रतापराव जाधव यांनी संपूर्ण जिल्हा वासियांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.अयोध्यामध्ये राम जन्मस्थळाच्या ठिकाणी राम मंदिरामध्ये राम लल्लाची मूर्ती स्थापन व्हावी. त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा व्हावी यासाठी अनेक पिढ्या खर्ची पडल्या, पण याची देही याचि डोळा रामलल्लाची स्थापना व प्राणप्रतिष्ठा दोन्ही पाहायला मिळाली ,हे आपल्या पिढीचे भाग्य.
Advt. 👆
राम व रामराज्य टिकून ठेवण्याची क्षमता लोकशाहीमध्ये लोकांच्या मतदानात आहे.त्यामुळे लोकांनी बहुसंख्येने मतदान ला जावे व आपल्या मतदानाचा हक्क बजवावा.राम आपल्याला सुख समृद्धी देवो,आपल्या सर्वांना अभिप्रेत असलेले रामराज्य पुन्हा येवो यासाठी मी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो,असे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले.