ईसोलीत जयश्रीताई शेळके आणि राहुल बोंद्रेंच्या विजयासाठी ग्रामदेवतेला साकडे! उबाठाचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनात अनोखा उपक्रम;
आपल्या नेत्यांसाठी सौ.अनिता येवले यांनी ठेवला उपवास
Nov 3, 2024, 18:48 IST
इसोली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल बोंद्रे व बुलढाणा विधानसभा मतदारसंघांच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांचा लाखाच्या लीडने विजय व्हावा यासाठी ईसोलीत ३ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्यावतीने ग्रामदेवता जगदंबा मातेला पातळ चढवून साकडे घालण्यात आले. आपल्या नेत्यांचा बहुमताने विजय व्हावा याकरिता अनिताताई येवले यांनी निवडणूक होईपर्यंत उपवास ठेवला आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. आपल्या नेत्यांसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यंदा गुलाल आपलाच असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. इसोली येथे महाविकास आघाडीच्यावतीने राहुल बोंद्रे आणि जयश्रीताई शेळके यांच्या विजयासाठी देवीला साकडे घालण्यात आले. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुद्धा हार अर्पण करण्यात आला. गावातून रॅली काढण्यात आली. वाजतगाजत ग्रामदेवता जगदंबा मातेला पातळ चढवण्यात आले. देवीमाता आशीर्वाद दे, आमच्या नेत्यांना जिंकू दे असे साकडे घालण्यात आले.
यावेळी शिवसेना उबा ठा जिल्हा संपर्कप्रमुख मा नरेंद्र खेडेकर यांच्या मार्गदर्शनात शिवसेना उबाठा पक्षाच्या विजयाताई खडसन, माजी सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, संतोष वाकडे भीमराव गिरगुणे, समाधान सुपेकर, सुरेंद्र खपके, सुभाष आटोळे दामू अण्णा येवले विजय गीते शंकर रायकर तसेच संपूर्ण महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते इसोली उपस्थित होते.