उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जयश्रीताईंचे वादळी भाषण गाजले! म्हणाल्या, बुलडाण्यात उर बडवून विकासाचा दावा पण विकास झाला नाही; नकली दाताप्रमाणे हा माणूसही नकली..."ये शेर नहीं भेडिया हैं" म्हणाल्या....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज बुलडाण्यात जाहीर सभा पार पडली. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारासाठी पार पडलेल्या या सभेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थित उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी केलेले भाषण प्रचंड वादळी ठरले ..त्यामुळे त्यांचे भाषण चांगलेच गाजले.. फर्ड्या वक्त्या म्हणून ओळख असलेल्या जयश्रीताईंचे भाषण आज उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच ऐकले, आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनीही जयश्रीताईंच्या वक्तृत्वशैलीचे कौतुक केले..नेहमी पेक्षा जयश्रीताईंचा चांगलाच आक्रमक पवित्रा यावेळी पहायला मिळाला. जयश्रीताईंच्या भाषणामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चांगलेच चैतन्य पसरले..आपल्या भाषणातून जयश्रीताई शेळके यांनी विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्यावर नाव न घेता चांगलाच हल्ला चढवला.. "बुलडाण्यात उर बडवून विकास झाल्याचा दावा केला जातो मात्र विकास झालेला नाही..नकली शिवसेनेचा हा नकली उमेदवार आहे.. नकली दातासारखा हा नकली माणूस आहे.."ये शेर नहीं भेडीयां है" असे जयश्रीताई शेळके म्हणाल्या.
१९६७ नंतर ५० वर्षांहून अधिक काळ लोटला.आजपर्यंत कोणत्याही पक्षाने बुलढाणा विधानसभेत महिलेला उमेदवारी दिली नव्हती..मात्र ५० वर्षानंतर आता महिला लोकप्रतिनिधी होता येणे हा माझ्यासाठी शिवसेनेने केलेला सन्मान आहे असे म्हणत त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राला भकास करण्याचे काम महायुतीने केले आहे. महाराष्ट्राची संस्कृती.परंपरा धुळीस मिळवण्याचे काम महायुतीने आणि इथल्या लोकंप्रतिनिधीने केले असल्याचा घणाघात त्यांनी केला.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात उर बडवून बडवून विकास कामे झाल्याचा दावा केला जातो मात्र विकास झाला नाही.आता गावागावात विकास कामांचे बोर्ड लावले जात आहेत. मात्र जी कामे आधीच्या लोकं प्रतिनिधींनी केली, ग्रामपंचायत ने केली ती कामे त्यांनी यांच्या बोर्डावर दाखवली आहेत.त्यांचं स्वतःच काही सांगण्यासारखं त्यांच्याकडे नाही असे जयश्रीताई म्हणाल्या. आता गावागावात तुमच्याकडे ते मती मागायला येतील तेव्हा त्यांना हिशोब विचारा असेही जयश्रीताई म्हणाल्या. बुलडाणा मतदारसंघात सिंचनाचा कोणताही मोठा प्रकल्प नाही.शेतरत्यांची कामे रखडली आहेत. बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी यांनी काही काम केलं नाही असा आरोपही जयश्रीताई शेळके यांनी केला. इथे आता शिवसेनेच्या जुन्या लोकांना धमकावल्या जात आहे. मात्र घाबरू नका..हा नकली शिवसेनेचा नकली उमेदवार आहे.. नकली दाताप्रमाणे हा माणूसही नकली आहे."ये शेर नहीं भेडीयां हैं असे जयश्रीताई म्हणाल्या. त्यांची जयश्री शेळके या नावावर बोलण्याची हिंमत नाही म्हणून आता ते माझ्या परिवारावर घसरले आहेत. त्यांच्या पापांचा घडा आता भरला आहे असेही जयश्रीताई म्हणाल्या. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून २३ नोव्हेंबरला विजयाची दिवाळी भेट उद्धव ठाकरे साहेबांना द्यावी असे आवाहन करीत, मतदारांनी आशीर्वाद देण्याची विनंती केली..